'कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर झाला का हो?' वाचकाचे 'सकाळ'ला फोन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे : ''हॅलो, मी सदाशिव पेठेतून दिलीप... बोलतोयं, पुणे लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेसचा उमेदवार ठरला का हो?', अशी विचारणा करणारे अनेक फोन "सकाळ'च्या कार्यालयात खणखणत आहेत. उदाहरणादाखल एका फोनचा उल्लेख केलायं. परंतु पुणेकरांना कॉंग्रेसच्या उमेदवाराबाबत किती उत्सुकता आहे, हे दर्शविणारा हे फोन आहेत. 
 
अर्थात "सकाळ' कार्यालयात दिवसभरात हजारो फोन येत असतात. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत दरदिवशी साधारणत: पावणे दोनशे दुरध्वनी हे केवळ कॉंग्रेसचा उमेदवार ठरला का? असे विचारण्यासाठी येत आहेत. एकेकाळी पुण्यावर सत्ता गाजविणारे कॉंग्रेस गेल्या दोन निवडणूकांमधून अक्षरश: गायब झाले आहे. मात्र, आता उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या तीन दिवसांवर आली असताना आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवसही जवळ येत असताना अद्याप कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर न झाल्याने पुणेकरही फोनकरून आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

"कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्याचे तुम्हाला आधी कळेल हो,' असे अगदी विश्‍वासाने सांगत पुणेकर दररोज "सकाळ'ला फोन करून चौकशी करत आहेत. 

Web Title: Who is Congress Candidate in pune? Reders call to Sakal