Kasaba By-Poll Election : टिळक कुटुंबीयांना डावलून 'भाजपा'ने पुढे आणलेले हेमंत रासने कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Rasne
Kasaba By-Poll Election : टिळक कुटुंबीयांना डावलून 'भाजपा'ने पुढे आणलेले हेमंत रासने कोण?

Kasaba Bypoll : टिळक कुटुंबीयांना डावलून 'भाजपा'ने पुढे आणलेले हेमंत रासने कोण?

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या जागी कोण येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले. टिळक कुटुंबीयांना जागा मिळणार अशी शक्यता असतानाच भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातून त्यांचे पती शैलेश टिळक आणि त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भाजपाने कुणाल टिळक यांना भाजपा प्रवक्तेपदी नियुक्त करत या निवडणुकीतून त्यांचा पत्ता कट केला. त्यांच्याजागी कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोण आहेत हेमंत रासने?

हेमंत रासने हे पुण्यातले भाजपा नगरसेवक आहेत. ते सलग चार वर्षे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2002, 2012, 2017 तीन वर्षे पुणे महापालिकेत नगरसेवक होते. तर 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. सुवर्णयुग सहकाही बँकेचे ते अध्यक्ष असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आहेत.

स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महसुली उत्पन्नात विक्रमी वाढ झाली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास करण्यासाठी पुण्यदशम सेवा त्यांच्या पुढाकाराने सुरू झाली.

टॅग्स :Hemant rasanePMC Election