राष्ट्रवादीवर लेटर बॉम्ब टाकणारा 'तो' कार्यकर्ता कोण?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पक्षातील गटातटाचे राजकारण उकरून काढत, निनावी पत्राची भलतीच चर्चा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करीत आहेत. दुसरीकडे, मात्र, हा उद्योग विरोधकांचा डाव असल्याचे खापर पक्षातील काही नेते फोडत आहेत. त्याचवेळी पत्र आल्याची कुबलीही काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

पुणे : राजकीय ओहोटी लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर "पत्र बॉम्ब' फेकून पक्ष श्रेष्ठींपासून कार्यकर्त्यांच्या वर्तुळाला हादरे देणारा पक्षाचा कार्यकर्ता कोण? याची चर्चा राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील गटातटाचे राजकारण उकरून काढत, निनावी पत्राची भलतीच चर्चा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करीत आहेत. दुसरीकडे, मात्र, हा उद्योग विरोधकांचा डाव असल्याचे खापर पक्षातील काही नेते फोडत आहेत. त्याचवेळी पत्र आल्याची कुबलीही काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

राष्ट्रवादीला निनावी पत्राचा दणका

निवडणुकांच्या तोंडावर राजकीय संकट ओढविले असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निनावी पत्र हल्ला झाल्याचे उघडकीस आले. पुण्यातील पक्ष संघटनेतील नव्या नेमणुका करताना केवळ मराठ्यांना स्थान दिल्याचा आरोप करीत, पक्षाचे शहराध्यक्ष, खासदार, प्रवक्ते, महापालिकेतील विरोधी पक्षनेता, सात विधानसभ मतदारसंघाचे अध्यक्ष हे मराठा समाजाचे आहेत, असा उल्लेख पत्रात आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) त्याबाबतच्या वृत्तासह मूळ पत्र प्रसिध्द होताच पक्ष संघटनेत त्याची चर्चा रंगली. सोशल मीडियावर या विषयावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा खरपूस समाचारही घेतला. मात्र, ही व्यक्ती कोण? ती पक्षातील कुठच्या गटाची असावी ? खरोखरीच नव्या संघटनेतील पदांचे वाटप करताना जातींचा विचार झाला आहे का ? असे अनेक प्रश्‍नही यानिमित्ताने विचारले जात आहेत. 

दरम्यान, याच मुद्यावरून माध्यमाच्या प्रतिनिंधिनी स्थानिक नेत्यांना प्रश्‍न विचारले. तेव्हा, "भाजप-शिवसेनेपैकी कोणी तरी हा प्रकार घडवून आणला. या दोन्ही पक्षांचे अपयश झाकले जावे, यासाठीच राष्ट्रवादीत वेगळी चर्चा घडविण्याचा डाव करण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. तरीही, राष्ट्रवादीवर हल्लाबोल करणारा पत्रलेखक कोण ? याचा शोध पक्ष पातळीवर सुरू असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the party Worker who dropped the letter bomb on NCP