शास्तीकराच्या भुर्दंडामुळे नागरिकांनी आत्महत्या केल्यास त्याला जबाबदार कोण - राजेंद्र जगताप

मिलिंद संधान
बुधवार, 25 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) - "पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा फसवा प्रयत्न सत्ताधारी भाजपा कडून करण्यात आला. त्यामुळे शास्तीकराच्या भुर्दंडामुळे शहरातील नागरिकांनी महापालिकेत येऊन आत्महत्या केल्यास त्याला जबाबदार कोण? "असा उद्विग्न सवाल माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत नुकतीच सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. परंतु लोकांच्या हिताचे निर्णय घेतल्यास या समस्या उद्भवनारच नाही, त्यामुळे 'आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला' असा प्रकार चालविल्याचे जगताप यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  

राज्य शासणाबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजाचाही बोजवारा वाजत असताना सत्ताधीकारी मात्र महापौर, उपमहापौर बदलात व्यस्त झालेत. अनाधिकृत बांधकामांच्या संदर्भात आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या आरोळ्या ठोकल्या परंतु पुढे काय आले तर ' खोदा पहाड निकला चुहा '. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासीयांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे त्यांनी आपल्या पत्रकात नमुद केले आहे. 

माजी नगरसेवक जगताप म्हणाले, " फसव्या कर्जमाफिला कंटाळून शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत वाढ झाली म्हणून तेथे सुरक्षा जाळी बसविण्यात आली. अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर असताना येथील महापालिकेतही सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. कदाचित शास्तीकराच्या धास्तीमुळे येथील लोकही महापालिकेत येऊन आत्महत्या करतील की काय अशी भिती भाजपावाल्यांना वाटत आहे. त्यामुळे अशा जाळ्या बसविण्यापेक्षा लोकांची कामे करा. 

"मागील चार दोन महिन्या पुर्वी पिंपळे गुरव परिसरात एका अनाधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान एका महिलेने ईमारतीवरुन उडी घेतल्यामुळे तिचा मृत्यु झाला. अशा घटना भविष्यात घडु नये म्हणुन सत्ताधारी भाजपच्या प्रतिनिधीनी व महापालिकेने संपुर्ण शहरालाच जाळी मारुन घ्यावी अशी बोचरी टिका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

Web Title: Who is responsible for civilian suicides due to property tax