शिवण्यातील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण

shivne
shivne

शिवणे - नवभारत शाळेच्या चौकातील अरुंद रस्ता, रस्त्याला पडलेले खड्डे, पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही, गावठाणाकडे जाणारा रस्ता अरुंद त्यामुळे जर रोजची वाहतूक कोंडी ठरलेली आहे. वाहतूक पोलिस असून फायदा होत नाही. दिवसातून तीन चार वेळा तरी या या परिसरात वाहतूक कोंडी होते. तिला महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण की पोलिस जबाबदार कोण असे नागरीक विचारत आहे. 

वारजे माळवाडीहून- शिवणे- कोंढवेधावडे हा रस्ता आहे. शिवणे चौकात पुन्हा वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. त्याची पाहणी सकाळच्या वतीने केली असता. त्या रस्त्यावर शिवणे येथील नवभारत हायस्कूल चौकात रस्त्यालगत असलेल्या टपर्‍या, झाडे यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या चौकातून पुण्याला जाणाऱ्या जाण्यासाठी स्वतंत्र रस्त्याची लेन केली तरीही वाहतूक कोंडी कमी होईल. नांदेडच्या बाजूने चारचाकी, स्कूलबस व मोठी अवजड वाहने आल्यानंतर ती वाहने पुण्याकडे किंवा उत्तमनगरकडे जाताना त्यांना पूर्ण रस्ता रिकामा लागतो. तरच ते वाहन वळते अन्यथा वाहतूक कोंडी ठरलेली आहे. 

मुख्य रस्त्यावरून नांदेड किंवा शिवणे गावठाणाकडे जाण्यासाठी जो रस्ता सुरु होतो. त्याच्या तोंडावर त्या रस्त्याच्या पश्चिमेला विजेचा खांब आहे. तर पूर्वेला शाळा आहे त्या शाळेची भिंत आहे पत्र आहे. यामुळे येथे मोठी वाहने आली की अडचण होत असते. 

या चौकात पूर्वी दोन ठिकाणी कालव्याचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन जलवाहिन्या होत्या. त्यातून पूर्वी पावसाचे पाणी वाहून जात आहे. त्या जलवाहिनीतून आता पाण्याच्या वाहिन्या, केबल्स टाकल्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठीच्या दोन्ही जलवाहिन्या बंद झाल्या आहेत. यामुळे या चौकात पावसाचे पाणी साठवून खड्डे पडतात यामुळे, वाहतूक कोंडी होण्यास अधिक भर पडते. या चौकात दोन पोलिस वाहतूक विभागाचे दोन पोलिस असतात. आज पाहणी केली असता येथील पोलीस हे प्रामुख्याने हो लोखंडी सळ्या जे वाहून नेतात त्या टँपो अडवित होते. कोंडी झाली की ती सोडविण्यास जात होते. सकाळी एक महिला होती तिला हे वाहतूक कोंडी सोडविता आली नाही त्यानंतर दोघे वाहतूक पोलिस आले होते.

दोन महिन्यानंतर जैसे थे 
सकाळ ने मांडलेल्या या चौकाची व्यथा मांडली होती. त्यानंतर आमदार भीमराव तापकीर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर फक्त दोन पोलिस येथे थांबू लागले आहेत. महापालिकेने करावयाच्या उपाययोजना केल्या नाहीत. सार्वजनिक बांधकांम विभागाने देखील हा रस्ता अद्याप काँक्रीट केलेला नाही. या मुले वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत आमदार तापकीर काय निर्णय घेतात. त्याकडे, नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com