पुण्यातील डुकरांचा धनी कोण ? सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे : डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली असून, प्रशासकीय दिरंगाई फसलेली वराह पालन योजना सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. त्याकरिता हडपसरमधील (सर्व्हे क्र.57) जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राव यांनी गुरुवारी जाहीर केले. दुसरीकडे, डुकरांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी नको. ठोस कार्यवाही करा, अशी मागणी हडपसरमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी राव यांच्याकडे केली. डुकरांचा "धनी' कोण ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

डुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी गेल्या वर्षात 48 लाख रुपये खर्च करून महापालिकेने पाच हजार डुके पकल्याचे सांगितले. ही योजना पूर्णपणे फसली असतानाही नव्याने 73 लाख रुपयांची तरतूद करीत, डुकरे पकडण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देऊन अधिकाऱ्यांनी आपले"हात ओले' करून घेतले आहेत. डुकरांची संख्या वाढत आहे.

लोकवस्तीत त्यांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर हडपसरमधील नगरसेवकांनी राव यांची भेट घेतली. डुकरांची समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. डुकरे पकडली जात नाहीत, मात्र, ती पकडल्याच्या नोंदी आहेत, एवढ्या प्रमाणात खर्च का केला जातो आहे, असे प्रश्‍नही नगरसेवकांनी विचारले. हडपसरध्ये वराह पालनसाठी जागा द्यावी, त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्याचे राव यांच्या निदर्शानसा आणून दिले. तेव्हा, राव यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून प्रस्ताव आणि जागेची वस्तुस्थिती जाणून घेतली. 

राव म्हणाले, ""डुकरांची समस्या गंभीर आहे. वराह पालन करणाऱ्या व्यावसायिकांची नोंद असायला हवी. ज्यामुळे शहरात नेमकी किती डुकरे ? याची माहिती मिळेल. या पुढील काळात डुकरे पकडण्यासाठी ठेकेदार नेमण्याऐवजी वराह पालनासाठी जागा दिली जाईल. त्यामुळे लोकवस्तीत डुकरांचा वावर राहणार नाही. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ठेकेदाराचे काम बंद करण्यात येईल.'' विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक नाना भानगिरे, मारुती तुपे, योगेश ससाणे, नगरसेविका वैशाली बनकर, नंदा लोणकर, हेमलता मगर, उज्ज्वला जंगले, पूजा कोद्रे, यावेळी उपस्थित होते. 

Web Title: Who is the wealthy of pigs in Pune? All-party Councilors Questions