‘सायन्स विझार्ड’ कोण ठरणार?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

उपक्रमाविषयी

  • स्थळ - अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍स, सिंहगड रस्ता, पुणे
  • तारीख व वेळ - २ फेब्रुवारी, सकाळी १० ते १ (कोणताही अर्धा तास)
  • प्रवेश शुल्क - रुपये ५०
  • अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ९३७३०३५३६९, ८७७९६७८७०९, ९८५००४७९३३

पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांसाठी संडे सायन्स स्कूल व ‘सकाळ’तर्फे सायन्स क्वीझचे आयोजन केले आहे. चौथी ते सहावी (लहान) व सातवी ते नववी (मोठा) या दोन गटांमध्ये ही क्वीझ होईल. ती मराठी व इंग्रजीमध्ये लिहिता येईल. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ध्या तासाची ही लेखी परीक्षा होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र अथवा मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक सोबत आणावे.
मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून संडे सायन्स स्कूल व ‘सकाळ’ यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. प्रयोगांतून विज्ञान शिकवणारा वार्षिक उपक्रम गेली नऊ वर्षे पुण्यात १२ केंद्रांवर यशस्वीपणे सुरू आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या क्वीझचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ५० मार्कांची ही क्वीझ असेल.

छोट्या गटामध्ये सहावीपर्यंतच्या विज्ञानावर, तर मोठ्या गटासाठी नववीपर्यंतच्या विज्ञानावर आधारित प्रश्‍न विचारले जातील. याशिवाय अवकाशशास्त्र व विज्ञानातील घडामोडींवर आधारित प्रश्‍नही असतील. दोन्ही गटांतील विजेते व उपविजेत्यांना आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी दिली जाईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल. ‘सकाळ संडे सायन्स स्कूल’मधील सहभागी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले विविध प्रयोग व प्रकल्प याच दिवशी १० ते ३ या वेळात अभिरुची मॉलमध्ये मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be the science wizard