ग्राहक-व्यापाऱ्यांसाठी कोडनेम बाजारातून मिळणार होलसेल मार्केट

Codename-Bazar
Codename-Bazar

पुणे - खरेदीचे ठिकाण किती सुरक्षित आहे, तेथे सर्व सुखसुविधा आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध आहे का? याचा विचार करूनच कोरोना काळात ग्राहक घराबाहेर पडत आहेत. अशा ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या व्यापाराच्या नवीन ठिकाणास सध्या पसंती मिळत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्राहक आणि व्यापाऱ्यांची हीच गरज ओळखून त्यांना एक चांगला पर्याय ‘जयराज ग्रुप आणि सॉलिटेअर’ उभारत असलेल्या ‘कोडनेम बाजार’ या प्रकल्पातून निर्माण होत आहे. सॉलिटेअर स्क्वेर, बिबवेवाडीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या २२ एकरच्या भव्य प्रकल्पात ५७४ ते १,५०० चौरस फुटांची दोन हजारपेक्षा अधिक दुकाने असणार आहेत. या प्रकल्पाच्या प्रसिद्धीस ‘सकाळ’चे विशेष सहकार्य आहे. त्या माध्यमातून प्रकल्पास अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. बाजारात आत्तापर्यंत साडे-सातशे व्यापाऱ्यांनी बुकिंग करत व्यापारवाढीचा मार्ग निवडला आहे. कोणताही ग्राहक जेव्हा बाजारपेठेत जातो तेव्हा त्याला सुरक्षित वातावरणात, पार्किंग, एकाच ठिकाणी वस्तूंच्या विविध पर्यायांसह सर्व सुखसुविधा हव्या असतात; मात्र सध्या उपलब्ध बाजारपेठांमध्ये या सर्वांची कमतरता दिसते. ही कमतरता ‘कोडनेम बाजारा’मध्ये आल्यानंतर दूर होईल, अशी खात्री ‘जयराज ग्रुप आणि सॉलिटेअर’ला आहे.

‘कोडनेम बाजार’ची वैशिष्ट्ये  
५ विशिष्ट झोनमध्ये ९ व्यापार श्रेणी
५००० हून अधिक वाहने व माल वाहतुकीच्या गाड्यांसाठी पार्किंग
२,४५,००० चौ. फूट स्टोरेज सुविधा  
३५,००० हून अधिक चौरस फूट लोडिंग-अनलोडिंगची 

२४ तास सुविधा 
१३,००० चौ. फूट एक्‍झिबिशन सेंटर 
विक्रेता केंद्र, ग्लोबल कनेक्‍टिव्हिटी आणि फूड कोर्ट सुविधा
पुण्याच्या स्मार्टेस्ट ट्रेडर्स (PST) क्‍लबचे सदस्यत्व
पुण्याच्या स्मार्टेस्ट ट्रेडर्स (PST) क्‍लबच्या सदस्यांना 

मिळणारे फायदे 
प्रीफर्ड सप्लायर म्हणून प्राधान्य
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यापाऱ्यांची प्रॉडक्‍ट लिस्टिंग
‘सकाळ’मध्ये प्रसिद्धी
रेडिओवर (FM) यशाच्या गोष्टी 
एमएसएमईला (MSME) नोंदणीसाठी १०० टक्के सहयोग 
आपल्या उत्पादनाच्या प्रदर्शनासाठी जागा 
उलाढाल वाढविण्यासाठी सर्व उपाययोजना

आपल्याकडे संघटित व्यापार करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कोरोनानंतरही आपण आहे तीच व्यापारपद्धती सुरू ठेवली तर लोकल ग्राहक मिळणेदेखील अवघड होईल. स्वतःची उत्पादन क्षमता वाढवत ‘आत्मनिर्भर’ भारत बनविण्यासाठी व संघटितपणे व्यापार करून आंतरराष्ट्रीय बाजारात आपली छबी उमटविण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले वातावरण ‘कोडनेम बाजार’ मध्ये आहे. व्यापारवाढीच्या संधी येथे आपली वाट पाहत आहे. 
- अशोकजी चोरडिया, संस्थापक, सॉलिटेअर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com