म्हणून आंबेडकर जयंतीला कृष्णा पाटलांच्या फोटोला हार घातला जातो

संपत मोरे 
सोमवार, 15 एप्रिल 2019

कृष्णा पाटील हे वारकरी होते. त्यांनी सलग 45 वर्षं त्यानी बाबासाहेबांच्या मिरवणुकीसाठी बैलगाडी दिली. त्यांच्या या कामाची पोहोचपावती म्हणून दरवर्षी जयंतीची मिरवणूक कृष्णा पाटील त्यांच्या घराजवळ आल्यावर त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन केले जाते. 

पुणे : 45 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील बलगवडे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. तेव्हा प्रतिमेच्या मिरवणुकीसाठी गावातील लोकांनी बैलगाडी दिली नाही. त्यावेळी कृष्णा दादा पाटील यांनी त्यांची गाडी बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी दिली. 

कृष्णा पाटील हे वारकरी होते. त्यांनी सलग 45 वर्षं त्यानी बाबासाहेबांच्या मिरवणुकीसाठी बैलगाडी दिली. त्यांच्या या कामाची पोहोचपावती म्हणून दरवर्षी जयंतीची मिरवणूक कृष्णा पाटील त्यांच्या घराजवळ आल्यावर त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन केले जाते. 

अशा या कृष्णा पाटील यांच्याविषयी सामाजिक कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले, "45 वर्षांपूर्वी शिवताशिवत पाळणाऱ्या काळात कृष्णा पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी त्यांची बैलगाडी देणे ही मोठी क्रांतीकारक घटना होती. पहिल्या वर्षी बैलगाडी दिल्यामुळे त्यांना गावकऱ्यांकडून विरोध झाला होता. पण त्यानी कोणत्याही विरोधाला जुमानले नाही. ते दरवर्षी स्वतः गाडी सजवून यायचे. मरेपर्यंत त्यांनी जयंतीसाठी गाडी दिली. उत्साहाने जयंतीत सहभाग घेतला. दरवर्षी आम्ही त्याना एक फेटा बांधून त्यांचा सत्कार करत होतो. आता ते नाहीत मग त्यांच्या धाडसाला सलाम करण्यासाठी आम्ही त्यांच्या फोटोला हार अर्पण करतो."

पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र उद्धव पाटील वडिलांचा वारसा जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीसाठी दरवर्षी त्यांचा ट्रॅक्टर देतात. 

Web Title: This is why Krushna Patil is worshiped on Babasaheb Ambedkar birth Anniversary