#Loksabha2019 : 56 इंचाची छाती कुलभूषण जाधव यांना का सोडवू शकली नाही : शरद पवार 

sharad p.jpg
sharad p.jpg

पुणे : ''एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या विंग कमांडर अभिनंदनला मायदेशी आणल्याचे श्रेय 56 इंच छाती वाले घेत होते. मग हीच 56 इंचाची छाती कुलभुष जाधव यांना का सोडवून आणू शकली नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केला. ते पुण्यात झालेल्या आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

अभिनंदन यांना मायदेशात परत पाठवण्यासाठी जगभरातील सुमारे 50 देशांनी पाकिस्थानवर दबाव आणला होता. त्यामुळे पाकिस्तानने अभिनंदनला मायदेशी पाठवले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे लोक याचे श्रेय घेत आहेत. जर, 56 इंचाच्या छातीमुळे अभिनंदन मायदेशी आणला असेल तर, मग जाधव यांना हीच 56 इंचाची छाती मायदेशी का आणू शकली नाही. असा प्रश्न उपस्थित करीत पवार म्हणाले, "सगळं मीच करतोय या अविर्भावात पंतप्रधान मोदी वागत आहेत. असा टोला यावेळी पवारांनी मोदींना लगावला."

''खाऊंगा ना खाणे दूंगा'' असे सांगत सत्तेत आलेले पंतप्रधान मोदी हे, ज्यांनी कधी कागदाचे विमान बनवले नाही. अशा उद्योजकांना राफेलच काम दिलं आहे. तसेच एका विमानाची किंमत ५५० कोटी वरुन १६५० कोटी कशी झाली, याची माहिती मागितली तर, राफेल कराराची माहिती संरक्षण सुरक्षिततेचे कारण देत गुप्त का ठेवली जाते, असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला. 

वर्ध्यातील सभेत मोदी यांनी केलेल्या टिकेला पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ''विकासाबाबत जनतेला सांगण्या सारख काही नसल्यामुळे मोदी हे अखंडपणाने गांधी घराण्यावर टिका करत आहे. आता त्यांना सोडुन ते माझ्यावर टिका करु लागले आहेत." मला वाटलं चला आपण गांधीच्या पंक्तींना जाऊन बसलो, असा टोमणाही त्यांनी यावेळी मारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com