Loksabha 2019 : नोटाबंदी, जीएसटीची जाहिरात का करीत नाही? 

Loksabha 2019 :  नोटाबंदी, जीएसटीची जाहिरात का करीत नाही? 

पिंपरी -""मोदी सरकारने नोटाबंदी केली. जीएसटी लागू केला. एवढे मोठे निर्णय घेऊनही सरकार मत मागताना त्याची जाहिरात का करीत नाही,'' असा सवाल माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

कॉंग्रेसच्या इंटकच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते, त्या वेळी ठाकरे बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार नेते डॉ. कैलास कदम, शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ""सर्वसामान्य जनतेच्या केंद्राकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांनी दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले होते. नोकऱ्या देणे तर सोडा; पण सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे उद्योग बंद होऊन बेरोजगारांची संख्या वाढली. शहिदांच्या नावावर पाकिस्तानविरोधात मतदान मागायचे आणि तिकडे जाऊन बिर्याणी खायची, हे काम मोदी सरकारचे आहे. सरकार उद्योगपतींच्या हातात आहे. पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटींना घेतले. कॉंग्रेसला सर्वसामान्य माणसाचे सरकार चालवायचे आहे, उद्योगपतींचे नाही.'' अजित पवार यांनीही केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. शिरूर आणि मावळमधून आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com