मटनाचा वाढलाय भाव, खिशाला परवडेना राव!

Why Rate on Mutton have Increased in market.jpg
Why Rate on Mutton have Increased in market.jpg

पुणे : मटण, तसा मांसाहारी खवैय्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. मटणाचे नाव उच्चारले, तरी झणझणीत मसाला घालून बनवलेल्या चविष्ठ मटणाचे ताट डोळ्यासमोर तरळते, तोडांला अक्षरशः पाणीही सुटते. पण तुमच्या जिभेला जरा आवर घालाचं ! कारण सध्या मटण म्हंटले कि, त्याच्या चवीपेक्षा भावाचाच जास्त विचार करण्याची वेळ आली आहे. 500 रुपये किलो दराने मिळणारे मटण आता सहाशे रुपयांपर्यंत पोचले आहे. दुसरीकडे मटणाचे दर गगनाला भिडण्याचे कारण आता थेट जागतिक स्तरावरील चामडी उद्योगापर्यंत पोचल्यचे वास्तव आहे. 

आमचं ठरलंय,चिकन घरी आणायचं,मटण पाहुण्यांच्या घरी खायचं

मद्रास येथील वानमवडी आणि त्या परिसरात चामडी टॅनरिजमध्ये पाठविली जात होती. परंतु चीन, युरोप, रशिया येथील चामाडीची 80 टक्‍क्‍यांनी मागणी घटली आहे. चामडीला पर्याय फॅब्रिक्‍स आले आहे. जाळल्या नंतरच ते काय आहे हे कळते. त्यामुळे प्रतवारीनुसार 100 ते 250 रुपयांपर्यंत विकले जाणारे कातडे 70-80 रुपयांना विकले जात आहे. त्यातून होणारा तोटा मटनामधून भरून काढला जातो. 

महाराष्ट्रातील मेंढी, शेळी बाजारात चेन्नई, हैद्राबाद, केरळ, कलकत्ता येथील व्यापारी चढ्या दराने खरेदी करतात. त्यामुळे आम्हाला देखील त्याचा भावात खरेदी करावी लागत आहे. मेंढी शेळी उत्पादित भागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात मेंढ्या आणि शेळ्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे मटणाचे भाव वाढत असल्याचे माहिती मटन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि उपाध्यक्ष हानिफभाई शेख यांनी सांगितले. सध्या चाकणचा सर्वांत मोठा बाजार आहे. आठवड्यात साधारणतः 20 हजार शेळ्या-मेंढ्यांची आवक होत असल्याचे मटण दुकानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार नीकुडे यांनी सांगितले. 

मटणाचे दर वाढण्याची प्रमुख कारणे 

  • मटण खाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ 
  • हॉटेल चालकांकडून मटणाला जादा मागणी 
  • मटणाची मागणी वाढली, आवक मात्र कमी 
  • फॅक्‍टरी बंद झाल्याने चामडीचे दर घटले 
  • बीड, नगर, सोलापुर, कर्जतमध्ये जादा पावसामुळे उत्पादन घटले 
  • परराज्यातील व्यापारी चढ्या दराने माल खरेदी करतात 


मटण येते कुठून ? 
वार- ठिकाण 
सोमवारी - अकलूज, बेला, तळेगाव ढमढेरे 
मंगळवारी - राशीन 
बुधवारी - संगमनेर, लोणी, नातेपुते, पाथर्डी, मिरजगाव, म्हसवड 
गुरुवारी- लोणन, सायखेडा (निफाड) 
शुक्रवार - घोडेगाव (नगर) 
शनिवार- शिरूर चाकण 


मटणाचे भाव - 
मागील महिन्यातील भाव - 500 -520 
सध्याचा भाव - प्रती किलो (दर्जानुसार) 560-580. 


''सध्यातरी आम्ही ग्राहकांवर कोणताही बोजा देत नाहीत. रविवारी साधारणतः 100 किलो मटन लागते परंतु पुण्यात 60 किलोच मिळत आहे. त्यामुळे साताऱ्यासह विविध भागातून आम्ही ते मागवतो.''
- माधव सुर्वे, सुर्वेज नॉनव्हेज हॉटेल. 

''मटणाचे भाव वाढले असल्यामुळे मी मटण खाणे कमी केले आहे. मटण खाणे आता खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदाच खातो.'' 
- नारायण वायबसे, खवय्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com