...म्हणून कोळसे पाटील यांना आम्ही बोलू दिले नाही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

महाविद्यालयाने भाषणाची परवानगी नाकारली असताना बी.जी. कोळसे पाटील यांनी भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील एल्गार परिषेद आयोजनामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी विरोध केल्याची माहिती अनिल ठोंबरे यांनी दिली.

पुणे :  महाविद्यालयाने भाषणाची परवानगी नाकारली असताना बी.जी. कोळसे पाटील यांनी भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील एल्गार परिषेद आयोजनामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी विरोध केल्याची माहिती अनिल ठोंबरे यांनी दिली.

'बी.जी. कोळसे पाटील जर संविधानाची चुकीची मांडणी करणार असतील तर विद्यार्थ्यांना मान्य नाही. अशा लोकांनामहाविद्यालयात कार्यक्रम घेण्याचा अधिकार नाही.' अशी मागणी ठोंबरे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने केली आहे. 

भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवाजागर व्याख्यानमाले अंतर्गत बी. जी. कोळसे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार आज दुपारी 12 ते 3 या वेळेत भारतीय संविधान या विषयावर महाविद्यालयातील अॅम्फी थिएटरमध्ये व्याख्यान ठेवले होते. पण, ऐनवेळी प्रशासनाने व्याख्यानाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला. अखेर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात व्याख्यान झाले. 

 

Web Title: why student let did not speak Kolse Patil