पिंपरी : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

संदीप घिसे 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी तृप्ती जय तेलवाणी (वय 21) हिला अटक केली आहे. कांचन देवीदास तेलवाणी (वय 40, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी (पुणे) : विविध कारणावरून पतीचा छळ करत त्याची मित्र मंडळींमध्ये बदनामी केली.  या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी (पुणे) येथे घडली आेह. याप्रकरणी  पोलिसांनी पत्नीस अटक केली आहे. 

जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी तृप्ती जय तेलवाणी (वय २१) हिला अटक केली आहे. कांचन देवीदास तेलवाणी (वय ४०, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मार्च 2018 ते 13 नोव्हेंबर 2018 या कालावधीत फिर्यादी यांची सून तृप्ती हिने आपला पती जय यास घरगुती कारणावरून तसेच वारंवार पैशांची मागणी करीत छळ केला. पैसे न दिल्याने त्यास शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.

स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत त्याचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच आपल्या पतीला कॅन्सर झाला आहे, अशा टिक टॉक व्हिडिओ बनवून तो त्याच्या मित्रमंडळींना दाखवत पतीची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून जय यांनी आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Wife arrested for husbands suicide in Pimpri