प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

हरिदास कड
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला. याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल नथू बच्चे (वय 37, रा. राजगुरुनगर, खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

चाकण (पुणे) : पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला. याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल नथू बच्चे (वय 37, रा. राजगुरुनगर, खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पूनम विठ्ठल बच्चे (वय 30, रा. शिवसाम्राज्य रेसिडेन्सी, राजगुरुनगर, खेड), तिचा प्रियकर राजेंद्र बाळासाहेब आसने (वय 21, रा. आंबेठाण चौक, चाकण), नीलेश गोरक्षनाथ अनुसे (वय 23, रा. सिद्धिविनायक नगर, मेदनकरवाडी, चाकण) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तिघांना 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश खेड न्यायालयाने दिल्याची माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिली.

विठ्ठल बच्चे हे आंबेठाण येथील महिंद्रा सीआयई कंपनीत कामाला होते. 6 ते 7 जुलैच्या दरम्यान भाम-रोहकल रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल बच्चे यांचा मृत्यू झाल्याची खबर बच्चे यांचा भाऊ बाळू बच्चे यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी तशी नोंद केली. यानंतर पोलिसांनी विठ्ठल बच्चे यांची पत्नी पूनम हिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने पती कंपनीत कामाला चालले होते. त्यावेळी अपघात झाला असे सांगितले. पोलिसांनी कंपनीत चौकशी केल्यानंतर बच्चे यांना कंपनीत कामास बोलविले नसल्याचे समजले. पत्नी पूनम खोटे बोलत असल्याचे पोलिसांना समजले. पूनम हिचे आसने याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. त्यानंतर आसने याचा मित्र नीलेश अनुसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने बच्चे यांचा अपघात झालेला नसून पूनम हिने तिचा प्रियकर राजेंद्र आसने याच्या मदतीने त्याचा खून केला आहे, अशी कबुली दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Murder Husband