पुनावळेत पत्नीने केला दारूड्या पतीचा खून 

crime_logo
crime_logo

पिंपरी (पुणे) - दारू पिऊन मारहाण करीत असल्याच्या रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (ता.१८) सायंकाळी पुनावळे येथे घडली. 

गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय २८, रा. लेबर कॅम्प, पांढरे वस्ती पुनावळे) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. राणौ गजानन निषाद (वय २४, मूळगाव छत्तीसगड) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. याबाबत ठेकेदार रणविजय कुमार साह (वय २९, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गजानन हा आपल्या पत्नी राणौला वारंवार दारू पिऊन मारहाण करत असे. याचा राग मनात धरून राणौ हिने सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com