चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीच्या अंगावर ओतले उकळलेले तेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे : किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पत्नीने पतीच्या अंगावर उकळलेले तेल ओतले. ही घटना शनिवारी सायंकाळी भवानी पेठेत घडली. 

पुणे : किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पत्नीने पतीच्या अंगावर उकळलेले तेल ओतले. ही घटना शनिवारी सायंकाळी भवानी पेठेत घडली. 

याप्रकरणी पती इम्रान सलीम शेख (वय 37, रा.भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पत्नी कलिमुन इम्रान शेख हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरुन त्यांची भांडणे झाली होती. त्याचा राग आल्याने पत्नीने आंघोलीला गेलेल्या पतीच्या अंगावर तेल टाकले. त्यामुळे पतीला काही प्रमाणात भाजले आहे.

Web Title: wife poured hot oil on husband due to doubting on her

टॅग्स