चाकूच्या धाकाने पत्नीने पतीला लुटले 

संदीप घिसे 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

चाकूचा धाक दाखवून पत्नीने घरातील 55 हजारांचा मौल्यवान ऐवज आणि दुचाकी चोरून नेल्याची तक्रार पतीने केली. ही घटना निगडी येथे घडली. 

पिंपरी (पुणे) : चाकूचा धाक दाखवून पत्नीने घरातील 55 हजारांचा मौल्यवान ऐवज आणि दुचाकी चोरून नेल्याची तक्रार पतीने केली. ही घटना निगडी येथे घडली. 

सचिन प्रभाकर चव्हाण (वय 40, रा. राजेशिवाजीनगर, चिखली) यांनी निगडी ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पत्नी सोनिया सचिन चव्हाण यांच्यासह अन्य दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आणि सोनिया सध्या विभक्त राहत आहेत. रविवारी सकाळी सोनिया आणि तिचे दोन साथीदार हातात चाकू घेऊन घरात घुसले. तिने सचिन यांना चाकूचा धाक दाखवून कपाटात ठेवलेली 55 हजारांची रोकड आणि पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी जबरदस्तीने घेऊन पळून गेली. 

Web Title: wife robbed with knife to husband

टॅग्स