होय, पत्नीकडून होतोय पतीचा छळ 

मंगेश पांडे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- पिंपरी पोलिस आयुक्तालयात पुरुषांचे तक्रारी अर्ज 
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग
- प्रेमप्रकरण व मोबाईल ठरतेय कारणीभूत 

पिंपरी (पुणे) : पतीकडून पत्नीचा छळ होतो, असा दावा महिला नेहमीच करतात. मात्र, पत्नीकडून पतीचा छळ होत असल्याचे ते मान्यच करणार नाहीत. हाच महिलांचा दावा आता खोडून निघेल. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 83 पत्नीपीडित पुरुषांचे पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

लग्नात हुंडा दिला नाही, माहेराहून पैसे आणावेत, स्वयंपाक येत नाही आदी कारणांवरून पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ होत असल्याच्या घटनांची विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद होत असते. महिलांना न्याय देण्यासह त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदेही कडक बनविण्यात आले आहेत. आयुक्तालयातील महिला सहायक कक्षातूनही पीडित महिलेचे समुपदेशन करण्यासह तिला आधार दिला जातो. या माध्यमातून पीडित महिलेला दिलासा मिळतो. 

No photo description available.

मात्र, ज्याप्रमाणे पुरुषांकडून महिलांचा छळ होतो. त्याप्रमाणे पुरुषांचाही महिलांकडून छळ होतो. याबाबतचे तक्रार अर्ज पत्नीपिडित पुरुष हे पोलिस आयुक्तालयात दाखल करीत आहेत. डिसेंबर 2018 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत 83 पुरुषांनी अर्ज दाखल केले आहेत. पत्नीच्या त्रासाला कंटाळून काही पुरुषांनी आत्महत्येचा मार्गदेखील निवडला आहे. 

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी : अशोक चव्हाण

सासू-सासऱ्यांशी जमवून न घेणे, स्वतंत्र राहण्याचा हट्ट, पतीच्या योग्य त्या गोष्टी न ऐकणे, नोकरी व मिळणारा पगार यासह बदलती लाइफ स्टाइल, विचारांमधील बदल आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होत असतात. या माध्यमातून पत्नीकडून पतीला मानसिक त्रास दिला जात असल्याने पतीचे मानसिक खच्चीकरण होते. दरम्यान, यापासून न्याय मिळण्यासासाठी काही पुरुष कायदेशीर प्रक्रियेचा मार्ग स्वीकारतात. मात्र, त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा अनुभव अनेकांना येतो. 

मुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच

प्रेमप्रकरण कारणीभूत 

काही महिलांचे लग्नापूर्वी प्रेमप्रकरण असते. मात्र, लग्न करताना कसलीही कल्पना न देता लग्न लावले जाते. लग्नानंतर काही दिवसांनी संबंधित महिलेचा पूर्वीच्या प्रियकरासोबत संवाद वाढण्यासह भेटणेही वाढते. याबाबत पतीला कळल्यानंतर पत्नीला विचारणा केली जाते. मात्र, या गोष्टी बंद न करता उलट प्रियकराच्या मदतीने पतीलाच धमकाविण्यासह त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. 

सोशल मीडियाचा अतिरेक 

अनेक महिलांकडून मोबाईलवर सोशल मीडियाचा अतिवापर केला जातो. घरातील कामांकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्येच त्या मग्न राहतात. या कारणांमुळे अनेकदा पती-पत्नींमध्ये खटके उडतात. तसेच, सतत सुरू असणारी 'चॅटिंग' देखील भांडणासाठी कारणीभूत ठरते. 

एका गोष्टीवरून न्यायालयात किंवा पोलिसांत जाणे, आत्महत्येचा मार्ग निवडणे, असे होत नाही. यामागे इतरही कारणे असतात. त्यामुळे छोटी गोष्ट असली, तरी त्याबाबत कुटुंबीयांसह जवळच्या व्यक्तीजवळ बोलायला हवे. ज्येष्ठांचा सल्ला घ्यायला हवा. पती-पत्नींनी एकमेकांवर विश्‍वास ठेवून सुसंवाद ठेवावा. 
- डॉ. मनजित संत्रे, मनसोपचारतज्ञ, वायसीएम रुग्णालय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife tortures his husband in pimpri chinchwad city