जिल्ह्यातील वनजमिनींवरील अतिक्रमणांवर हातोडा

जिल्ह्यातील वनजमिनींवरील अतिक्रमणांवर हातोडा

कळस - पुणे जिल्ह्यातील वनजमिनीवरींल अतिक्रमणांवर वनविभागाने हातोडा उगारला आहे. जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, मुळशी, मावळ या तालुक्‍यांतील वनजमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांच्यावर वनगुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांना अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांनी दिली.

जिल्ह्यात वनविभागाचे १ लाख ८५ हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे उघड होत आहे. सध्या या वनजमिनीचे वनविभागाकडील सर्वेक्षण करणाऱ्या पथकाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यानंतर सीमांकण करून हद्द कायम करण्यात येत आहे. वनजमिनीवर झालेले अतिक्रमण संबंधितांना नोटीस देऊन काढण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०० हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात यश आले आहे. मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सुरू आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील कारवाईबाबत तेलंग यांनी माहिती दिली, की तालुक्‍यातील ६४ गावांमध्ये सुमारे ६ हजार २६४ हेक्‍टर क्षेत्र वनविभागाच्या मालकीचे आहे. या सर्व गावांतील वनजमिनीची मोजणी करून सीमांकण करण्यात येणार आहे. आतापर्यंत १४ गावांचे सीमांकण करण्यात आले आहे. ज्या गावांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल, त्या गावातील अतिक्रमण 

ज्या शेतकऱ्यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले आहे, त्यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय वन अधिनियम १९२७ च्या वनकायद्यानुसार वनजमिनींचे सर्वेक्षण, सीमांकण व वन हद्दनिश्‍चित करण्याचे अधिकार वनविभागाला आहेत. 
- राहुल काळे,  वनपरिक्षेत्र अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com