esakal | Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांच्या बाबतीत घडलेला योगायोग राज ठाकरेंबाबत घडणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Balasaheb-Thackeray

1990 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास म्हातोबाच्या दर्शनाने सुरुवात केली होती.

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांच्या बाबतीत घडलेला योगायोग राज ठाकरेंबाबत घडणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : कोथरूड गावाचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा मंदिरात दर्शन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ केला. 1990 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास म्हातोबाच्या दर्शनाने सुरुवात केली होती.

त्यावेळी म्हातोबाने सुतार यांना आशीर्वाद देत विजयी केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपकडे असलेला हा शिवाजीनगर मतदारसंघ हट्टाने भाजपकडून मागून घेऊन शशिकांत सुतार यांना विजयी केले होते. हाच योगायोग 29 वर्षांनी पुन्हा घडणार काय? अशी चर्चा कोथरूड परिसरात रंगली आहे.

किशोर शिंदे यांच्या विजयासाठी राज ठाकरे यांनी आपली ताकद लावली आहे. राज यांनीही म्हातोबाची दर्शन घेऊन प्रचारास सुरवात केल्यामुळे तेव्हाचा योगायोग पुन्हा जुळून येणार का? आणि किशोर शिंदे यांना म्हातोबा आशीर्वाद देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मंगळवारी सायंकाळी मनसेचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या कोथरुड मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. 

राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, किशोर शिंदे, राम बोरकर, विनोद मोहिते, सुधीर धावडे, मंदार बलकवडे, प्रशांत कनोजिया, सचिन विप्र आदी मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. उद्या (ता.9) दुपारी राज ठाकरे यांची पुण्यात प्रचारसभा होणार आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- '10 रुपयांत सकस आहार'; मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

- यावर्षी दोन वेळा साजरी होणार विजयादशमी - उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

- पुढच्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल- राऊत