Vidhansabha 2019 : भीम आर्मी लढवणार पुण्यातील आठही जागा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

सत्ताधारी पक्षातील लोकांकडून वारंवार संविधानाचा अपमान होत आहे. त्यांना सत्तेतपासून दुर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी समविचारी पक्षाबरोबर आघाडी करणार आहोत. जर आघाडी झाली नाही तर, येत्या निवडणुकीत पुण्यातील आठही विधानसभा जागा लढवणार असल्याचे भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी सांगितले.

पुणे : विधानसभा :  सत्ताधारी पक्षातील लोकांकडून वारंवार संविधानाचा अपमान होत आहे. त्यांना सत्तेतपासून दुर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी समविचारी पक्षाबरोबर आघाडी करणार आहोत. जर आघाडी झाली नाही तर, येत्या निवडणुकीत पुण्यातील आठही विधानसभा जागा लढवणार असल्याचे भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी सांगितले.

सत्ताधारी पक्षाकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी भीम आर्मी समविचारी पक्षासोबत आघाडी करुन निवडणूक लढविणार आहे. मात्र, जर आघाडी झाली नाही तर पुण्यातील आठही विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे पोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Bhim Army fight on Eight places in Pune