Lokasabha 2019 : कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मोदी येणार बारामतीत?

test_02.jpg
test_02.jpg

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा होणार आहे. लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. 

बारामतीत 10 किंवा 11 एप्रिलला सभा होणार असल्याची माहिती भाजपचे सूत्रांनी दिली. या सभेची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी पंतप्रधानांनी बारामतीत सभा घेण्याचे मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्या या सभेबाबत अंतिम तारीख व वेळ निश्चित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार असल्याची माहिती बारामती झालेल्या भाजपच्या मेळाव्यात गिरीश बापट यांनी दिली होती. नरेंद्र मोदी स्वतः पुन्हा एकदा बारामती सभा घेणार असल्याने बारामतीतील भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान बारामतीत येऊन नक्की काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com