"खडकवासला'तून सोडणार  40 हजार क्‍युसेक विसर्ग? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

खडकवासला : दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे वरसगाव धरणात रात्री दहा वाजता 96 टक्के पाणीसाठा जमा झाला. रविवारी हे धरण 100 टक्के भरल्यानंतर त्यातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 40 हजार क्‍युसेकपेक्षा जास्त पाणीसाठा सोडला जाण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. त्यासाठी नदीकाठच्या रहिवाशांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. 

पानशेत धरणातून 12,936 क्‍युसेक पाणी सोडले आहे. ते पाणी खडकवासलामध्ये थेट जमा होते. तर खडकवासला धरणात 15 हजार क्‍युसेक विसर्ग जमा होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणे मिळून 27 हजार क्‍युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. वरसगाव धरण 96 टक्के तर टेमघर धरण 85 टक्के भरले आहे. शनिवारी रात्री या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्वच धरणांतून विसर्ग सोडल्यास खडकवासल्याचा विसर्ग 40 हजार क्‍युसेकपेक्षा जास्त वाढविला जाईल. शनिवारी सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथे 16 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत व वरसगाव धरणात अनुक्रमे 70 व 60 तर टेमघर येथे 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

सर्वाधिक विसर्ग 
खडकवासला धरणातून 1958 मध्ये एक लाख 13 हजार 392 क्‍युसेक, 1954 मध्ये एक लाख पाच हजार 140 क्‍युसेक, 1997 मध्ये 90 हजार 570 क्‍युसेक, 1983 मध्ये 86 हजार 490 क्‍युसेक, तर 1943 मध्ये 80 हजार 766 क्‍युसेक पाणी सोडले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will leave 'Khadakwasala' 40 Thousand Cusecs?