Loksabha 2019 : मोहन जोशींसाठी राष्ट्रवादी झटणार का?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : ''पुण्यात काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नसल्याने तोपर्यंत बारामती, मावळ आणि शिरुरमधील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते आता काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविणार का? असा प्रश्‍न काँग्रेसच्या गोटातून विचारला जात आहे. मात्र, जोशी यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचा प्रचार करीत असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. 

भाजपला विशेषत: या पक्षाचे उमेदवार पालकमंत्री गिरीष बापट यांना रोखण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची व्यूहरचना आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात बापट यांची उमेदवारी जाहीर झाला; पण काँग्रेसचे उमेदवार ठरला नव्हता. त्यामुळे उमेदवाराचे नाव जाहीर होईपर्यंत बारामती, मावळ आणि शिरुरमधील उमेदवाराचा प्रचार करण्याची सूचना पक्षाचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जबाबदारीही निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात काँग्रेसने जोशी यांच्या नावाला पसंती दिली.

भाजपच्या तुलनेत जोशी यांना प्रचारासाठी कमी अवधी मिळाल्याने मतदरापर्यंत पोचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी-नगरसेवकांची बैठक घेऊन जोमाने प्रचार करण्याचा आदेश दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात मेळावा घेत, प्रचाराची रणनिती ठरविली आणि पुण्यातून जोशी मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्‍वास व्यक्त केला. या मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. परंतु, हेच पदाधिकारी-कार्यकर्ते आता जोशी यांच्यासाठी घरोघरी पोचणार का?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मतदारसंख्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही समांतर प्रचार यंत्रणा राबविल्यास काँग्रेसला बळ मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. 
 
Web Title: Will the Nationalist struggle against Mohan Joshi?