नदीपात्राच्या रस्त्यातील अडथळे महिन्यांत दुर करणार : आयुक्त सौरभ राव

0STP18C38131_org.jpg
0STP18C38131_org.jpg

पुणे : नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यामध्ये दूर करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदेश आमदार विजय काळे यांनी नदीपात्रातील रस्त्याच्या विषयावर गुरुवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, डीपी चे राजेंद्र राउत,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक आदित्य माळवे, भाजप उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, जमीन मालक प्राचीताई शहा व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

कर्वे रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी बाबा भिडे पुलाकडून नदीपात्रातील रस्त्याने कोथरूड कर्वेनगरला जाण्यासाठीचा पर्यायी रस्ता म्हणून दुचाकीस्वार या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. मात्र, हा रस्ता रजपूत वीटभट्टी जवळ अत्यंत अरुंद होतो आणि रोज संध्याकाळी येथे वाहतूक कोंडी होते. ज्याचा स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना ही प्रचंड त्रास होतो. स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून 24 डिसेंबरला भैरवनाथ मंदिराकडून (मेहेंदळे गॅरेज चौकातून) नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी स्थानिक नागरिक तसेच येथील जमीन मालक प्राची शहा यांनी या समस्येबाबतची माहिती दिली. प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन ही दिले. यानंतर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आमदार विजयराव काळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याविषयी जमीनमालक व स्थानिकांची भूमिका सांगितली.

यावेळी 5 महिन्यापूर्वी घेतलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुढे काहीच न झाल्याबद्दल आमदार काळे यांनी नाराजी व्यक्त केली व रस्त्याचे महत्त्व समजून घ्यावे व युद्धपातळीवर हे काम केले जावे असे सांगितले. प्राची शहा आणि संदीप खर्डेकर यांनी " हा रस्ता डीपीत दर्शविल्याप्रमाणे 15 मीटर केल्यास काही घरांचे पुनर्वसन करावे लागेल.  येथे एसआरए होण्यास अडचणी निर्माण होतील हे निदर्शनास आणून दिले." यावर आयुक्त सौरभ राव यांनी " हा रस्ता करण्यासाठी येथील सर्व अडथळे दूर करण्यात यावे असे स्पष्ट आदेश देताना त्यासाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com