नीरा डाव्या कालव्यावर थांबून शेतकऱ्यांना पाणी देणार: भरणे

राजकुमार थोरात
शुक्रवार, 18 मे 2018

वालचंदनगर (पुणे): पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळण्यास उशीर झाला आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यास कटिबद्ध असून वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी नीरा डाव्या कालव्याच्या दाऱ्यावर उभे राहून शेतकऱ्यांना पाणी देणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

रेडणी (ता. इंदापूर) येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या साडे नऊ लाखांच्या निधीच्या कामांचा शुभारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, रेडणी सरपंच भीमराव काळे, दशरथ पाटील, सचिन चव्हाण, हरिभाऊ तरंगे, अनिल काळे, माऊली हाके, किसन काळे, महेंद्र पडळकर, ग्रामसेवक अर्चना लोणकर उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले कि, गेल्या१९ वर्षात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे तालुक्यामध्ये भरपूर पाणी येत आहे. यावर्षी तर इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निरा डावा कालवा उन्हाळ्यात ११२ दिवस सुरु राहणार आहे. पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास विलंब झाला आहे. मात्र, चार दिवसानंतर उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सुरु होणार असून सर्व शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित मिळावे यासाठी आपण जातीने लक्ष घालणार आहे. वेळप्रसंगी कालव्याच्या दाऱ्यावर थांबून पाणीवाटपाचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भरणे म्हणाले कि, तालुक्यातील विरोधक पाण्याच्या प्रश्नाचे राजकारण करीत आहेत. नीरा डावा कालव्याच्या टेलला आवर्तन सुरु असताना पश्चिम भागातील शेतकऱ्यांना भडकवायचे व पश्चिम भागात आवर्तन सुरु असताना टेलच्या भागातील शेतकऱ्यांना भडकवायचे काम विरोधक करीत असल्याचा आरोप भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.

Web Title: will wait on the left Neera canal and give water to the farmers say bharne