बॅट, सिलिंडर, शिटीला अपक्षांकडून पसंती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - बॅट, सिलिंडर, शिटी अन्‌ कपबशी... या चिन्हांना अपक्षांकडून पसंती मिळाली आहे. चिन्हाशिवाय निवडणूक होऊच शकत नाही. त्यामुळे सहज लक्षात राहील, असे चिन्ह मिळविण्याचा अपक्षांचा प्रयत्न राहिला आहे.

पुणे - बॅट, सिलिंडर, शिटी अन्‌ कपबशी... या चिन्हांना अपक्षांकडून पसंती मिळाली आहे. चिन्हाशिवाय निवडणूक होऊच शकत नाही. त्यामुळे सहज लक्षात राहील, असे चिन्ह मिळविण्याचा अपक्षांचा प्रयत्न राहिला आहे.

निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या पक्षांना त्यांचे अधिकृत चिन्ह दिले जाते. आयोगाची मान्यता नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी मात्र सर्वच ठिकाणी एकच चिन्ह घेण्यास पसंती दिली आहे. त्याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्यांना मात्र आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या चिन्हांच्या यादीतून चिन्ह निवडावे लागते. साधारपणे ४८ चिन्हांची यादी प्रत्येक निवडणूक कार्यालयात लावण्यात आली होती. त्यापैकी एक चिन्ह उमेदवारांना दिले गेले. निवडणुकीत चिन्ह हा महत्त्वाचा भाग असल्याने मतदारांच्या सहज लक्षात राहील, असे चिन्ह निवडण्याकडे उमेदवारांचा कल असतो. प्रामुख्याने बॅट, शिटी, कपबशी, पाटी, कपाट या चिन्हांना प्रत्येक निवडणुकीत मागणी असते. ती या वेळीही कायम राहिली. अंगठी, नारळ, नगारा, गॅस सिलिंडर, डिझेल पंप, इस्त्री, टपाल पेटी, बॅटरी टॉर्च, छताचा पंखा, टीव्ही यांनाही या वेळी पसंती मिळाली. बंडखोर उमेदवारांच्या दृष्टीने चिन्ह हा भाग महत्त्वाचा ठरतो. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आपल्या नावासह चिन्ह पोचविण्यासाठी ते सहज उपलब्ध आणि उपयोगात येणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देतात, असा अनुभव आहे.

११०२ उमेदवारांना चिन्ह
प्रमुख राजकीय पक्षांसह ११०२ उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या-त्या पक्षाचे चिन्ह दिले. नोंदणी नसलेल्या राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांनाही चिन्ह देण्यात आले. 

Web Title: Willow, cylinders, whistling choice from the independents