esakal | महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड  व जयंत आसगावकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर (ता. आंबेगाव) - महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील.

'पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी तयारीनिशी उतरली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये येवढे लक्ष दिले नव्हते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सर्व नेते झटून काम करत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांना मोठ्या मतांनी विजयी करा.' असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड  व जयंत आसगावकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर - 'पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी तयारीनिशी उतरली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये येवढे लक्ष दिले नव्हते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सर्व नेते झटून काम करत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांना मोठ्या मतांनी विजयी करा.' असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. २७) झालेल्या महाविकास आघाडी प्रचार सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, देवेंद्र शहा, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, माजी आमदार पोपटराव गावडे, बाळासाहेब बेंडे, शैलेश मोहिते, विवेक वळसे पाटील, पूर्वा वळसे-पाटील, प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, भगवान वाघ, अजित काळे उपस्थित होते.

PM मोदींच्या सीरम भेटीनंतर आदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

दिलीप वळसे पाटील म्हणाले 'अनेक संकटांवर मात करून ज्येष्ठ नेते शरद पवार, सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार वाटचाल करत आहे. या सरकारचे विधान परिषदेतील बहुमत बळकट करण्यासाठी राज्यातील सहाही जागा निवडून येणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी आहे.'

काय सांगता! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात CCTVच नाही

पवार म्हणाले 'पुणे पदवीधर मतदारसंघातून बारा वर्ष चंद्रकांत पाटील आमदार होते. पण एकदाही त्यांनी पदवीधरांचा प्रश्न विधिमंडळात मांडला नाही. तसेच स्वतः पदवीधरांचा आमदार आहे. याचाही उल्लेख त्यांनी कधीही केला नाही. मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची खात्री पटल्यामुळे चंद्रकांत दादा चिडलेले आहेत. त्यामुळेच ते पवार साहेबांबद्दल हिन पातळीवर टीका करतात. विरोधी उमेदवार संग्राम देशमुख यांचे वागण  कसे आहे. हे सांगली जिल्ह्यातील जनतेला आपण विचारू शकता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.'

जय जवान ॲकॅडमीचे यश; १८ जण सैन्यात भर्ती

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर यांनी शिवसेनेची बाजू मांडली ते म्हणाले, 'भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख घोडेगावला जात असताना लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भेटले होते. त्यामुळे गैरसमज पसरले होते. आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सर्व शिवसैनिकानी  महाविकास आघाडीचे उमेदवार लाड व आसगावकर यांनाच मतदान करावे. असे आदेश आढळराव पाटील यांना दिले आहेत. तसेच प्रचार आढावा बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांचा आढळराव पाटील यांना फोन आला होता. त्यामुळे शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. प्रामाणिकपणे शिवसैनिक महाविकास आघाडीचा धर्म पळणार आहेत.'

माजी आमदार पोपटराव गावडे, देवदत्त निकम, विष्णू हिंगे, मानसिंग पाचुंदकर, वसंतराव भालेराव, जे. के. थोरात, यांची भाषणे झाली. अजय आवटे यांनी आभार मानले. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

Edited By - Prashant Patil