जैनकवाडीत रणरागिणींनी उभी बाटली केली आडवी

संतोष आटोळे
गुरुवार, 31 मे 2018

तालुक्याच्या औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या जैनकवाडी येथील स्त्रियांनी कोणत्याही दबावाला न झुगारता त्या निर्भय पणे मतदानात सहभागी झाल्या. गावच्या प्रवेशद्वारावरच असेल्या विदेशी दारूच्या दुकानाची उभी बाटली 267 विरुद्ध 10 मतांनी त्यांनी आडवी केली.

शिर्सुफऴ (ता.बारामती) - तालुक्याच्या औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या जैनकवाडी येथील स्त्रियांनी कोणत्याही दबावाला न झुगारता त्या निर्भय पणे मतदानात सहभागी झाल्या. गावच्या प्रवेशद्वारावरच असेल्या विदेशी दारूच्या दुकानाची उभी बाटली 267 विरुद्ध 10 मतांनी त्यांनी आडवी केली.

विविध शासकिय पुरस्कार मिळालेले बारामती तालुक्यातील जैनकवाडी हे गाव आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासुन गावच्या प्रवेशकमानीजवळ ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता विदेशी मद्य विक्रीचा पंचतारांकित उद्योग सुरु करण्यात आला. तसेच या परिसरात लॉजवर विविध अवैध धंदेही केले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेवुन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बारामती तहसिल कार्यालयाच्या माध्यमातुन गुरुवार (ता.31) रोजी महिला मतदान झाले. एकुण 392 महिला मतदारांपैकी 300 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये आडव्या बाटलीसाठी (दारुबंदी) 267 मतदान व विरोधात 10 मतदान झाले. तर 23 मते बाद झाली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन निवासी तहसिलदार आर.सी.पाटील यांनी तर केंद्राध्यक्ष म्हणुन स्वाती गायकवाड यांनी काम पाहिले. 

प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मतदान केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक एस. डी. चौगुले, दुय्यम निरिक्षक राजन साळोखे, शोभा लांडगे, एस.व्हि. मोरे, एस.के. कान्हेकर यांच्या तालुका पोलिस स्थानकांचे बिट अंमलदार मारुती हिरवे, कुंभार, ग्रामसेवक गायकवाड, तलाठी महेश वाघ उपस्थित होते.

Web Title: wine banned in jainakwadi