विंग कमांडर अभिनंदन एवढेच बोलले...

abhinandan
abhinandan

पुणे - पाकिस्तानच्या ताब्यात असूनही भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा आत्मविश्‍वास तसूभर ढळलेला नव्हता की ते घाबरले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरील खंबीरपणा पाकिस्तानने प्रसारित केलेल्या व्हिडिओतून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. पाकिस्तानी सैन्याला अभिनंदन यांनी अवघ्या तीनच गोष्टी 
सांगितल्याचे दिसते. 

यामागचे कारण म्हणजे, आत्मविश्‍वास, ती निर्भयता आणि ते संयमाचे धडे या अधिकाऱ्यांना लष्करी प्रशिक्षणातून मिळाले असतात. याबाबत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी ‘सकाळ’शी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘युद्धात शत्रूच्या हाती पडल्यानंतर काय करायचे, या सगळ्या गोष्टीचे प्रशिक्षण वैमानिकांना दिलेले असते. जीनिव्हा कराराप्रमाणे जेवढे आवश्‍यक, तेवढेच बोलायचे असते. त्यात फक्त वैमानिकाचे नाव, त्यांची रॅंक आणि सर्व्हिस नंबर तीनच गोष्टी सांगणे आवश्‍यक असते. अभिनंदन यांनीही फक्त तेवढेच सांगितले. यापेक्षा कोणतीही माहिती सांगण्यास त्यांनी नकार दिला.’’ हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.  

अशा वेळी ‘इंटरनॅशनल रेड क्रॉस ऑर्गनायझेशन’ पुढे येते. भारताने या संघटनेला सांगायचे ते पाकिस्तानमधील याच संघटनेच्या प्रतिनिधींना सांगतात. ते युद्धकैद्याला भेटतातही. त्यामुळे त्याचा छळ होत नाही. अभिनंदन यांना सोडण्याविण्यासाठी भारतानेही तातडीने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्ताला बोलावून घेऊन वैमानिकाला परत पाठविण्याचे सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

नचिकेताची आठवण
अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याच्या बातमीची खात्री झाल्यानंतर २० वर्षांपूर्वी कारगिल युद्धात ग्रुप कॅप्टन कमबमपती नचिकेता हेदेखील अशाच प्रकारे पाकिस्तानच्या हातात सापडल्याची घटना तुम्हाला आठवली असले. अखेर, आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्तानने आठ दिवसांनंतर नचिकेता यांना सोडले होते. त्या वेळी नचिकेता यांचाही आत्मविश्‍वास कायम होता. जसा अभिनंदन यांचा आता आपल्याला दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com