विंग कमांडर अभिनंदन वर्धमान नक्की परत येईल : भूषण गोखले

gokhale
gokhale

पुणे : "पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान नक्की परत येईल आणि सुखरूप परत येईल,'' असा विश्‍वास एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. "भारताने 1971 साली युद्ध कैदी केलेल्या पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांना पोसले आहे, हे त्यांनी विसरू नये,'' याची आठवणही त्यांनी या वेळी पाकिस्तानच्या लष्कराला करून दिली.

'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी' आणि 'प्रबोधन मंच' यांच्यातर्फे आयोजित पाकिस्तानवरील नियंत्रित हवाई आणि भारताची संरक्षण सिद्धता' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आणि प्रबोधन मंचचे हरी मिरासदार या वेळी उपस्थित होते. 

"अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. त्या बाबतचा व्हिडिओदेखील "व्हायरल' झाला आहे. पण, तेथे त्याला त्रास देऊ नये. तशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून नये. कारण, तो वैमानिक आहे. त्याच्या देशाच्या संरक्षणाचे कर्तव्य तो बजावत आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 


नवीन विमानांची गरज 
'मिग 21' या लढाऊ विमानाबद्दल बोलताना गोखले म्हणाले, "मिग 21 बायसन हे बदल करून त्याला अद्ययावत केले आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ही विमाने 1964-65 पासून आहेत. अर्थात ती आता आपण निवृत्त करत आहोत. पण, बायसन आपण अजून पूर्ण क्षमतेने वापरत होतो. तसेच, मिग 29, मिराज, सुखोई ही विमाने अद्ययावत करून आपण वापरत आहोत. त्यामुळे सध्या आपल्याला नविन विमानांची गरज आहे, असेही गोखले यांनी सांगितले. 
प्रत्येक विमानाचे आयुष्य असल्याने ती कितीही वर्षे वापरता येत नाहीत. त्यामुळे हवाई दलाची ताकद कायम ठेवण्यासाठी त्याच्या ताफ्यातील काही विमाने नविन, तर काही मध्यम व जुनी अशा प्रकारची विमाने असली पाहिजे. संरक्षण खात्याची आर्थिक तरतूद आणि नवीन खरेदी यातून ही ताकद मिळत असते, असे ते म्हणाले. 

दहशतवाद ही जगाची डोकेदुखी 
दहशतवादी हल्ले फक्त एकट्या भारतात होत नाहीत. तर, इराण, अफगाणिस्तानपासून युरोपीय समुह आणि अमेरिकेतपर्यंत होत आहे. या सर्व हालचाली पाकिस्तानमधून होतात. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांमुळे त्यांची कोंडी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जनतेनेच राज्यकर्त्यांना सुधारावे 
पाकिस्तानवर सर्व बाजूंना दबाव आणला जात आहे. त्यांचे पाणी थांबवत आहोत, मोस्ट फेव्हर्ड कंट्रीचा दिलेला दर्जा परत घेतला आहे या सर्वांचा थेट परिणाम पाकिस्तानच्या जनतेवर होणार आहे. इतक्‍या दिवस पाकिस्तानतेला दुखवू नये, म्हणून त्यांच्या बरोबर अनेक गोष्टी करत होतो. त्यात सांस्कृतिक देवाण-घेणाव होती, क्रिकेट होते, अशा सर्व प्रकारातून भारत-पाकिस्तान संबंध ठेवले जात होते. कारण, भारत हा पाकिस्तानच्या जनतेच्या विरोधात नाही. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये आपण फक्त दहशवाद्यांच्या तळांनाच लक्ष्य केले. सामान्य जनतेला इजाही होऊ दिली नाही. इतकेच काय पण, लष्करी तळांनाही धक्का लावला नाही. त्यामुळए पाकिस्तानी जनतेनेच राज्यकर्त्यांना सुधारले पाहिजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com