कोरोनाची लढाई जिंकलेल्याचे आंबेगावात पुष्पवृष्टीने स्वागत

shinoli
shinoli

घोडेगाव / मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात गेल्या 14 दिवसांत एकूण दहा जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले होते. त्यापैकी शिनोली येथील अनिल बबन वाळुंज (वय 49) हे पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनाची लढाई जिंकल्यानंतर गावात आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर गावातील युवकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

आंबेगाव तालुक्यातील साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी, गिरवली, वळती या गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. हे सर्व रुग्ण मुंबईहून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्याच्यांही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. निरगुडसर, साकोरे व जवळे येथील रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

दरम्यान, अनिल वाळूंज यांना सरकारी रुग्णवाहिकेतून शिनोलीच्या बसस्थानकावर सोडले. घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार युवराज भोजने, ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे व युवक तेथे हजर होते. या सर्वांनी फुलांच्या पाकळ्या उधळून व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत  केले. हसतमुख स्वागत गावकऱ्यांकडून झाल्यामुळे त्यांचा तणाव दूर झाला. त्यांनीही आनंदी मनाने गावकऱ्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. त्यानंतर गावातील कुलदैवत भैरवनाथ मंदिराचे त्यांनी दर्शन घेतले. युवकांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला.  

यासंदर्भात अनिल वाळुंज यांचे बंधू सुनील वाळुंज म्हणाले की, शिनोलीच्या गावकऱ्यांनी, आरोग्य खात्याने व प्रशासनाने आमच्या कुटुंबाला फार मदत केली. सुरुवातीला आम्ही घाबरलो होतो, पण ग्रामस्थांनी वेळोवेळी धीर दिला. पुणे येथेही सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर परिचारिका व कर्मचाऱ्यांनी आमच्या बंधूला सतत प्रसन्न ठेवण्यासाठी एनर्जी देण्याचे काम केलं. त्यामुळेच महाभयंकर संकटावर त्यांना मात करता आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com