पुण्यात गारवा कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पुढील दोन दिवसांत आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पुण्यात किमान तापमान 13 आणि 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे

पुणे - राज्यातील बहुतांश ठिकाणचा गारवा शनिवारीही कायम होता. नाशिकमध्ये 12.6 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली, तर पुण्यात 12.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले.

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर मराठवाड्यात काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाल्याचे दिसून आले. रत्नागिरीमध्ये सरासरीच्या तुलनेत सात, तर कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, अमरावती येथे जवळपास चार अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानात तफावत झाल्याचे निदर्शनास आले. पुढील दोन दिवसांत आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पुण्यात किमान तापमान 13 आणि 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :-
कोल्हापूर (15), महाबळेश्‍वर (13.8), नाशिक (12.6), मुंबई (23.2), रत्नागिरी (15.5), उस्मानाबाद (13.9), औरंगाबाद (17.8), अकोला (16.5), अमरावती (15)

Web Title: Winter arrives in Pune