पुणे : उपक्रमांचं शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याला काढले शाळेबाहेर

मीनाक्षी गुरव
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे : शाळेमधील उपक्रमांसाठी असणारे शुल्क न भरल्यामुळे विमाननगर येथील व्हीजीटेक ऍकॅडमी शाळेने एका पहिलीच्या विद्यार्थ्याला सोमवारी सकाळी शाळेबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शाळेसाठी तयार होऊन आलेल्या विद्यार्थ्याला शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत येऊ न दिल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

विमाननगर येथील विमानतळ प्रवेशद्वाराशेजारी ही शाळा आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे.

प्रवेशाच्या वेळी वह्या, पुस्तकांची जवळपास पाच हजार रुपये शुल्क भरण्यात आले होते. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रम, कराटे प्रशिक्षण यासाठी आणखी पाच हजार रुपयांचे उपक्रम शुल्क भरा, असे शाळा प्रशासनाने सांगितले होते. त्यातील तीन हजार रुपये भरले असून केवळ दोन हजार रुपये शुल्क देणे बाकी आहे.

असे असतानाही शाळेत आलेल्या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारत शाळेने त्याला पुन्हा घरी पाठविले, असा आरोप पालक विजय भोसले यांनी 'सकाळ'शी बोलताना केला.

Web Title: WISITEK school denied entry to a student who could not pay fee for extra curricular activities

टॅग्स