पार्किंग नसलेल्या मंगल कार्यालयांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

आळंदी पोलिसांची माहिती; अतिक्रमणांवर कारवाईची मागणी 

आळंदी : धर्मशाळा आणि खासगी घराचा लग्नासाठी बेकायदा व्यावसायिक वापर होत असेल, तर पालिकेने त्यावर व्यावसायिक कर आकारावा. त्याचप्रमाणे पार्किंगची सोय नसेल, तर लग्न लावणाऱ्या धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करणार 
असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले. 

आळंदी पोलिसांची माहिती; अतिक्रमणांवर कारवाईची मागणी 

आळंदी : धर्मशाळा आणि खासगी घराचा लग्नासाठी बेकायदा व्यावसायिक वापर होत असेल, तर पालिकेने त्यावर व्यावसायिक कर आकारावा. त्याचप्रमाणे पार्किंगची सोय नसेल, तर लग्न लावणाऱ्या धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करणार 
असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले. 

आळंदी शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील नागरिकांची बैठक शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी आयोजित केली होती. या वेळी गायकवाड बोलत होते. या वेळी नगरसेवक डी. डी. भोसले, आदित्य घुंडरे, तुषार घुंडरे, स्मिता रायकर, प्रतिमा गोगावले, लता मिंढे, पुष्पा कुऱ्हाडे, संदीप नाईकरे उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले, ""लग्नामुळे आळंदीत रस्त्यांवर बेकायदा गाड्या उभ्या केल्या जातात. अनेक मंगल कार्यालयांच्या इमारती तीन मजली आहेत, मात्र पार्किंगची व्यवस्था नाही. अशा बेकायदा लग्न लावणाऱ्या धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांना पार्किंगची व्यवस्था नसेल, तर वाहनांवर आणि लग्न लावणाऱ्या कार्यालयांना दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.'' 

आळंदी पालिकेनेही या मालमत्तांना व्यावसायिक करआकारणी करणे आवश्‍यक आहे. शहरात विविध निमित्ताने मोर्चांचे आयोजन केले जाते. शांततेच्या मार्गाने आणि कायदा सुव्यवस्था राखत मोर्चाचे आयोजन करण्याचे आवाहन या वेळी गायकवाड यांनी केले. 

नगरसेवक डी. डी. भोसले म्हणाले, ""पालिका चौक, चाकण चौक, वडगाव चौक, मरकळ चौक या विविध ठिकाणी हातगाड्या तसेच अतिक्रमणांवर कारवाई होणे आवश्‍यक आहे.'' 

सामाजिक कार्यकर्ते संदीप नाईकरे म्हणाले, ""वाहतूक कोंडीला खराब रस्ते जबाबदार आहेत. शहरातील मंगल कार्यालयांना लग्न लावण्यासाठी वेळेचे बंधन घालावे. रात्री अपरात्री लग्न लावणाऱ्या कार्यालयांवर गुन्हे दाखल करावेत. प्रमुख रस्त्यांवर गतिरोधक उभारावेत. जीवघेण्या अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.'' 

बैठकीतील प्रमुख मुद्दे... 
- शहरात एकेरी वाहतूक कडक करावी. 
- ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मिरवणुकांवर कठोर कारवाईची गरज. 
- धर्मशाळा, मंगल कार्यालयांतील लग्नांची पालिकेत नोंदणी सक्तीची व्हावी. 
- अवैध प्रवासी वाहतूक आणि धंद्यांवर कठोर कारवाई व्हावी. 
- अतिक्रमण आणि पथारीवाल्यांवर जप्तीची कारवाई करावी. 
 

Web Title: without Parking Any Hall police give an action