विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात व्होक फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमा परवानगी 

मिलिंद संगई
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने बी. व्होक फूड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमास नुकतीच परवानगी दिली. सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली. 

गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरु करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्या नुसार महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला होता. त्याला नुकतीच परवानगी मिळाली. हॉटेल्स, बेकरी, अन्नप्रक्रीया आदी उद्योगात अभिरुची असलेल्या विद्यार्थी व व्यावसायिकांनीही उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणा-यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र प्राप्तहोईल. सर्टिफिकेट कोर्स इन फूड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा, अँडव्हान्स डिप्लोमा व पदवी या शैक्षणिक प्रणालीत हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 

अद्ययावत सोयीसुविधा, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार, कुशल मनुष्यबळ अशी विद्या प्रतिष्ठानची ओळख आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, विश्वस्त अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी नवीन अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Wok Food Technology Course in Vidya Pratishthan College