संगणक अभियंता तरुणीच्या खूनप्रकरणी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

देहू रोड/ पुणे  - संगणक अभियंता अंतरा देबानंद दास (वय 23) हिचा खून केल्याच्या संशयावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी तरुणाला अटक केली. त्याला बंगळूर येथून ताब्यात घेतले होते.

संतोषकुमार अखिलेशप्रसाद गुप्ता (वय 24, रा. आरा, भोजपूर, बिहार) असे त्याचे नाव आहे. तो बंगळूर येथे आयटी कंपनीत कामाला होता. त्या वेळी त्याची अंतराशी मैत्री झाली होती. त्याने एकतर्फी प्रेमातून मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

अंतरा ही पश्‍चिम बंगालची असून, ती सहा महिन्यांपूर्वी तळवडे येथील कॅपजेमिनी आयटी कंपनीत रुजू झाली. ती प्राधिकरण येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तळवडे येथे शुक्रवारी रात्री अंतराच्या डोक्‍यावर हत्याराने वार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी देहू रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

संतोषकुमार हा अंतराला त्रास देत होता, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचे पथक सोमवारी बंगळूरला गेले होते. या पथकाने तेथून संतोषकुमारला ताब्यात घेतले. त्याला बुधवारी पुण्यात आणून चौकशी केल्यानंतर अटक केली. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश होडगर, शंकर जम, सतीश कुदळे, गणेश महाडिक, सुनील जावळे, देहू रोडचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे, प्रकाश अहिवळे, बाळासाहेब अहिवळे यांनी ही संयुक्‍त कारवाई केली. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आज संतोषकुमारला वडगावमावळ न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने त्याला चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाईल केला होता ब्लॉक
संतोषकुमार हा बंगळूरच्या ट्रायसिस सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता आहे. त्याने अंतरा दास हिला कंपनीमध्ये जॉब मिळवून देण्यास मदत केली होती. काही दिवस तो पिंपरी-चिंचवड येथे मुक्‍कामी होता. फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून तो तिच्या संपर्कात होता. तो तिला लग्नाची मागणी करून त्रास देत असल्याचे अंतराने घरी सांगितले होते. तिने त्याचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: woman arrested in the murder of a computer engineer