वाकीला माय-लेकीने घेतली नदीत उडी; आईचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

वाकीखुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मायलेकींनी भामा नदीमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील नव्या पुलावरून उडी मारली...

चाकण : वाकीखुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मायलेकींनी भामा नदीमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील नव्या पुलावरून उडी मारली. यात आईचा मृत्यू झाला तर मुलीला स्थानिकांनी व पोलिसांनी वाचविले. यात मीरा राजेंद्र उबाळे (वय ५४, रा. चाकण, नेहरु चौक, ता. खेड) यांचा मृत्यू  झाला. तर त्यांची मुलगी (वय. ३१) वाचली. मुलीवर किरकोळ उपचार केल्यानंतर तिला पोलिस ठाण्यात आणण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन महिलांनी पुलावरून भामा नदीत उडी घेतल्याची माहिती चाकण पोलिस  अधिकारी, पोलिस तसेच वाहतूक शाखेचे पोलिस यांना समजली त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले.पोलिस व नागरिकांच्या मदतीने उडी मारण्यात आलेल्या महिलांना  पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​

दोघींना चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यात मुलीच्या आईचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर मुलीला वाचविण्यात यश आले. घरगुती वादविवाद झाल्यानंतर या दोघी आम्ही निघून चाललो असे म्हणून सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या. मुलगी अविवाहीत आहे. मुलीला दोन भाऊ आहेत. या घटनेबाबत वडीलांनी पोलिसांना माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman commits suicide by jumping river