पिसाळलेला कुत्रा चावलेल्याने एका महिलेचा मृत्यू

A woman dies after being bitten by dog at baramati.jpg
A woman dies after being bitten by dog at baramati.jpg

बारामती शहर : कुत्र्यांच्या दहशतीखाली बारामतीकर असल्याचे यापूर्वीही वारंवार दिसले होते. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका विवाहीतेचा पुण्यात मृत्यू झाल्याने आता मात्र हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  

दीपाली धनंजय जाधव (वय 27) असे या विवाहीतेचे नाव असून पुण्यात ससून रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. बारामतीतील देवतानगर परिसरात 5 नोव्हेंबर रोजी पतीसोबत दुचाकीवरुन फिरायला निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कुत्र्याने दीपाली यांच्या हाताला अचानकच चावा घेतला. त्याच दिवशी याच कुत्र्याने शहरातील जवळपास वीस जणांना चावा घेतला होता. कुत्रे चावल्यानंतर दीपाली यांनी इंजेक्शन घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांना शहरातील काही रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचीही माहिती पुढे येत असून त्यांना नंतर ससून रुग्णालयात हलविले गेले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. 

कासारवाडीत ट्रकची दोन मोटारींना धडक; पुणे मार्गावर वाहतूक कोंडी

एका तरुण विवाहीतेचा कुत्रे चावल्याने मृत्यू होणे ही बाब धक्कादायक असून बारामतीत आता कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी होत आहे. दीपाली यांच्या मागे त्यांची छोटी मुलगी आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने ही मुलगी आता पोरकी झाली आहे. त्यांचे पती धनंजय यांनाही या घटनेने कमालीचा धक्का बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com