बारामतीत कालव्यात पडून महिलेचा मृत्यू

बारामती शहरातील नीरा डावा कालव्यामध्ये पाय घसरुन पडल्याने एका महिलेचा आज दुर्देवी मृत्यू झाला.
Drown
DrownSakal
Summary

बारामती शहरातील नीरा डावा कालव्यामध्ये पाय घसरुन पडल्याने एका महिलेचा आज दुर्देवी मृत्यू झाला.

बारामती - शहरातील नीरा डावा कालव्यामध्ये पाय घसरुन पडल्याने एका महिलेचा आज दुर्देवी मृत्यू झाला. सरस्वती गुणवंत तोंडारे (वय 67, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे या महिलेचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सरस्वती या आपल्या मुलीकडे वास्तव्यास ओझर्डे इस्टेट येथे आल्या होता. आज सकाळी फिरायला त्या नीरा डावा कालव्याच्या भरावावर गेल्या होत्या. चालताना पाय घसरुन त्या पाण्यात पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती हे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी आहेत.

आज सकाळी परकाळे बंगल्यानजिक असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर बीटमार्शल ठोंबरे, मनोज पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो वर काढला. त्या नंतर त्याची ओळख पटविली गेली.

कालव्यात पोहोणे धोकादायक....

बारामतीत कालव्याला सिमेंटच्या स्लॅबचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कालव्यात एखादी व्यक्ती पडल्यास तिला वर येणे अवघड बनते. सिमेंटच्या अस्तरीकरणामुळे एखाद्या व्यक्तिने वर येण्याचा प्रयत्न केला तरी अंग ओले असल्याने घसरून पुन्हा पाण्यात पडतात, पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने दम लागतो, त्याने बाहेर पडणे अवघड होत असल्याने आता नीरा डावा कालव्यात पोहोणे जीवावर बेतणारे ठरु शकते, त्या मुळे सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com