धक्कादायक, कोरोनावर मात केलेल्या महिलेचा परतच्या कोरोनाने मृत्यू

dead_body
dead_body

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील साखर येथील ज्येष्ठ महिलेचा बुधवारी (ता. ८ ) कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर, वेल्हे येथील कोविड केअर सेंटरमधील ३५ वर्षीय महिला डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच, आरोग्य विभागातील बारा जणांचे व कोळवडी येथील बाधितांच्या संपर्कातील चार जणांचे, असे सोळा जणांचे स्वॅब आज तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. 

साखर येथील मृत्यू झालेल्या महिलेला दम्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. या महिलेस कोरोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु, दवाखान्यामध्ये छातीचा त्रास झाल्याने अतिदक्षता विभागात हलविल्यानंतर कोरोनाची पुन्हा टेस्ट केली. त्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. यादरम्यान उपचार करताना काल त्यांचा मृत्यू झाला. 

तसेच, वेल्हे येथील कोविड केअर सेंटरमधील महिला डॉक्टरच्या पतीची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर काल या महिला डॉक्टरचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागामध्येच भितीचे वातावरण निर्माण झाले. या महिला डॉक्टरच्या संर्पकातील बारा जणांचे, तर कोळवडी येथील बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 
चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.

Edited By : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com