महाळुंगे येथे कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

corona.jpg
corona.jpg

औंध : महाळुंगे (पाडाळे) येथे आज पंचाहत्तर वर्षीय कोरोनाबाधीत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून येथील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

दरम्यान, मृत्यू झालेले तिन्ही रुग्ण ज्येष्ठ असून मृत रुग्णांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. महाळुंगे ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंतची एकूण रुग्णांची संख्या ४४ झाली आहे. यातील  २६ जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाळुंगे ग्रामपंचायत हद्दीत तीस जून रोजी पहिल्यांदा कोरोना बाधीत महिला आढळून आली होती. यानंतर ग्रामपंचायत हद्दीत जवळपास दोन आठवडे एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र या दोन महिन्यात रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

वयोवृद्ध पुरुष रुग्ण औंध येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान दगावल्याने महाळुंगे हद्दीत कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. यानंतर एका ज्येष्ठ महिलेचा तर आजही एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com