Pune : टँकर दुचाकीच्या अपघातात महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : टँकर दुचाकीच्या अपघातात महिला ठार

मांजरी : महादेवनगर-मांजरी रस्त्यावर टँकर व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने जागीच ठार झाली. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकरचालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

अन्नपूर्णा उर्फ सूमन विजय पाटील (वय ४२, रा. महादेवनगर, मांजरी रोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीमती पाटील आपले पती विजय पाटील यांच्या मागे बसून दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. त्याचवेळी पाठीमागून दुधाचा टँकर भरधाव वेगाने येत होता. मांजरीकडून येताना दुर्गामाता मंदिरासमोर असलेल्या वळणावरील अरूंद रस्त्यावर दुचाकी घसरून अन्नपूर्णा पाटील टँकरच्या बाजूला पडल्या. त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक जाऊन त्या जागीच ठार झाल्या. तर पती विजय बाहेरील बाजूस पडल्याने किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या अपघातामुळे सुमारे पाऊनतास येथेवाहतुकीचा खोळंबा झाला होता.

या रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम झाले आहे. मात्र, या वळणावर जागा संपादीत न झाल्याने एक पदरीच काँक्रीटीकरण झाले आहे. या काँक्रीट रस्त्याचे कठडे उघडे असल्याने रस्त्यावर वाहन चढवताना अनेक दुचाकी घसरत असतात. अशा ठिकाणी वारंवार छोटेमोठे अपघात होत आहेत.

टॅग्स :Pune Newspuneaccident