महिलेला भररस्त्यात दौंड शहरात पेटवले

Fire
Fire

दौंड - दौंड शहरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिस ठाण्यासमोरून विव्हळत गेलेल्या या महिलेकडे संवेदनाहीन रेल्वे पोलिसांनी ढुंकूनही पाहिले नाही. 

दौंडचे सहायक निरीक्षक हृषीकेश अधिकारी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. शहरातून लिंबाचा पाला तोडून तो दररोज रेल्वेने मुंबई येथे पाठविण्याचे काम करणाऱ्या या २५ वर्षीय महिलेविरुद्ध पांगारी काळे नामक महिलेने रविवारी दौंड रेल्वे स्थानकावर वादावादी करीत तिला शिवीगाळ केली. त्यानंतर सदर महिलेला पांगारी, तिचा पती व तिच्या वडिलांनी शालिमार चौकातील एका भाजी विक्री दुकानासमोर ओढत आणून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत तिघांनी पळ काढला. परिसरातील नागरिकांनी महिलेच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली; परंतु सैरभैर झालेली महिला भाजलेल्या अवस्थेत दौंड रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस ठाण्यासमोर गेली. दरम्यान, तिला भाजलेल्या अवस्थेत पाहून एका नागरिकाने दौंड पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील महाडीक व पथकाने तिला तातडीने उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ५५ टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. 

याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीनुसार पांगारी काळे, तिचा पती व वडील (नावे उपलब्ध नाहीत) या तिघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजल्यानंतरही हेळसांड
रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांनी नकार दिल्याने दौंड पोलिसांनी सरकारी जीपमधून भाजलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल केले. तिचा जबाब घेण्यासाठी पोलिसांनी दौंडचे तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांचेही मोबाईल स्वीचऑफ होते. त्याशिवाय प्रशासकीय इमारतीमध्ये कोणीही जबाबदार महसूल अधिकारी नसल्याने पेच निर्माण झाला होता. अखेरीस वैद्यकीय अधीक्षकांच्या उपस्थितीत जबाब नोंदविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com