पुणे : ...अन् रिक्षातच झाली महिलेची प्रसुती

Woman Gave Birth to her Child In Auto Rickshaw in Pune.jpg
Woman Gave Birth to her Child In Auto Rickshaw in Pune.jpg

लोणी काळभोर : वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतीमुळे महिलेची रिक्षातच सुखरूप प्रसूती झाली. तिला तिच्या बाळासह नंतर लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

का राहणार रेल्वेसेवा ३१ डिसेंबरपर्यंत विस्कळितच? 

पुणे-सोलापूर रस्त्यावर कदमवाकवस्ती हद्दीत कवडीपाट टोल नाक्‍यावर ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. केशवनगर येथील ही गर्भवती महिला मांजरी बुद्रुकमार्गे कवडीपाट टोल नाक्‍यावरून लोणी काळभोरच्या आरोग्य केंद्रात रिक्षातून जात असताना तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. ती ओरडू लागल्याने, टोल नाक्‍याजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी थांबलेले पोलिस घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ काही महिलांना बोलावले, तसेच शेजारील घरांतून साड्या गोळा केल्या. संबंधित महिलेची रिक्षातच प्रसूती झाली.  

"पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभागृहात भाजप-सेनेत खडाजंगी
पोलिस हवालदार मुकुंद रनमोडे, पोलिस नाईक संदीप देवकर, संतोष शिंदे व ट्रॅफिक वॉर्डन दादा लोंढे यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हे चौघे टोल नाक्‍याजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे होते. ही महिला रिक्षातून आरोग्य केंद्रात निघाली होती. रिक्षा टोल नाक्‍याजवळ पोचताच, महिलेला कळा सुरू झाल्या. चालकाने रिक्षा बाजूला घेतली असता, संबंधित महिला व तिचा पती मदतीसाठी ओरडू लागले, तेव्हा चौघांनी रिक्षाकडे धाव घेतली. महिलेची स्थिती पाहून संदीप देवकर व संतोष शिंदे यांनी शेजारील घरांतून महिलांना बोलावले. रिक्षाभोवती मानवी कडे तयार केले. महिला बाळंत होताच, तिला बाळासह तत्काळ कवडीपाट येथील रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्‍टर नसल्याने, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दोघांची तब्बेत उत्तम असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी दिली. संदीप देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज देवकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com