पुण्यात उसणे पैसे न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

चोवीस वर्षाच्या विवाहीत महिलेला उसणे दिलेले पैसे मिळत नसल्याचा फायदा घेत महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार हडपसर हद्दीत घडला. जीवे मारण्याची धमकी देत असल्याने घाबरून पीडित महिलेने आईला प्रकार सांगितल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​

हडपसर : चोवीस वर्षाच्या विवाहीत महिलेला उसणे दिलेले पैसे मिळत नसल्याचा फायदा घेत महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार हडपसर हद्दीत घडला. जीवे मारण्याची धमकी देत असल्याने घाबरून पीडित महिलेने आईला प्रकार सांगितल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्वप्नील प्रकाश कांबळे ( वय २७ रा. महात्मा फुले नगर, गणपती मंदिर जवळ, थरमॅक्स चौक, पिंपरी) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला ही कामासाठी हडपसर हद्दीत एकटी राहते आणि ती पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करत आहे. तेव्हा ऑफिसमध्ये काम करत असताना, स्वप्नील कांबळे यांच्याशी ओळख झाली होती. एकदा महिलेने स्वप्नील यांच्याकडून पाच हजार रुपये उसणे घेऊन पतीला दिले होते. मात्र, काही दिवसानंतर सुनील पैसे मागू लागला, पीडित महिला म्हणाली, ''ते पैसे मी माझ्या पतीला दिले आहेत, ते आल्यावर देतील'', असे तिने सांगितले होते. मात्र. १ सप्टेंबर २०१९ ला पीडित महिला व भेटायला आलेले पती घरी असताना, स्वप्नील कांबळे घरी आला आणि तो पैसे मागू लागला. तेव्हा दोघांकडे पैसे नसल्याने पती त्याला पैसे देऊ शकले नाहीत.

काही वेळाने सुनील आणि पती हे दोघे निघून गेले. मात्र त्यानंतर काही वेळाने स्वप्नील कांबळे हा पुन्हा घरी आला आणि त्याने महिलेवर बलात्कार केला. ''याबाबत कोणाला सांगितले तर तुला संपवून टाकेन'' अशी जीवे मारण्याची धमकी स्वप्नीलने दिली. काही दिवसानंतर झालेला प्रकार आई वडिलांना सांगितल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Woman raped for failing to pay borrowed money in Pune