अंथरुणाला खिळलेली महिला तिच्या पायवर उभी राहिली

नवनाथ भेके
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

निरगुडसर : उपचाराअभावी गेल्या सहा महिन्यापासुन अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय-65) या महिलेला उपचारनिधी व ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एकुण 1 लाख 56 हजार रुपये जमा करुन महिलेवर उपचार केले. त्यामुळे साधे बसता सुद्धा येत नसलेली महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहीली असुन घरातील कामे करु लागली आहे.

निरगुडसर : उपचाराअभावी गेल्या सहा महिन्यापासुन अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय-65) या महिलेला उपचारनिधी व ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एकुण 1 लाख 56 हजार रुपये जमा करुन महिलेवर उपचार केले. त्यामुळे साधे बसता सुद्धा येत नसलेली महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहीली असुन घरातील कामे करु लागली आहे.

निरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्चर होऊन त्या गेल्या सहा महिन्यापासून अंथरुणाला खिल्या होत्या. त्यांना स्वत:ची कामे करण्यास सुद्धा मोठी पराकाष्ठा करावी लागत होती. परंतु त्यांच्या कुटुंबासाठी खरडत खरडत जाऊन त्या थोडासा का होईना स्वंयपाक करत होत्या. अशावेळी त्यांना प्रत्येक दिवशी मोठ्या कसोटीला सामोरे जाव लागत होते. याप्रकाराची माहीती निरगुडसर गावातील माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांना कळल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर संबंधित महिलेचे पती बबन वाघ यांच्यासमवेत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांची भेट घेऊन सर्व माहीती दिली त्यानुसार वळसेपाटील यांच्या प्रयत्नातुन मुख्यमंत्री निधीतुन 75 हजार व सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातुन 25 हजार असा एकुण 1 लाख रुपयांचा निधी मिळवुन दिला व उर्वरित कमी पडलेली 56 हजार रुपयांची रक्कम रामदास वळसेपाटील यांनी स्वत:कडील 22 हजार रुपये व बाकी गावातुन उभी करुन भोसरी येथील साईनाथ हॅास्पिटलमध्ये उपचार केले. यावेळी डॅा. सुहास कांबळे यांनी मोठे सहकार्य केले.

बाळासाहेब येवले, प्रकाश कटारीया, सुरेश टाव्हरे, संदीप वळसे पाटील, हनुमंत टाव्हरे, अनिल टाव्हरे, चंद्रकांत वळसे पाटील, नारायण गोरे, सुनिल वळसेसर, गोरक्षनाथ टाव्हरे, निलेश टाव्हरे, सचिन वाळुंज, दिलीप वळसे पाटील, अनिल वळसे पाटील, नवनाथ टाव्हरे, डॅा. अतुल साबळे, जनार्दन मिंडे, मिलिंद वळसे पाटील, कैलास सुडके, बाळशिराम टाव्हरे, बाबा टाव्हरे, दिगंबर सुडके, जालिंदर टाव्हरे यांच्यासह निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरु विदयालयातील संतोष टाव्हरे यांच्या 1994/95 च्या दहावी बॅचच्या ग्रुपने लोकवर्गणीतुन पैशाची उभारणी करुन त्या महिलेवर उपचार करण्यात आले.

माझ्यासाठी ती माऊलीसारखीच धावुन आली.
सुमन वाघ म्हणाल्या की, भोसरी येथील साईनाथ हॅास्पिटल येथे गेल्या 15 दिवस उपचारासाठी होते, माझ्या कपड्यासह जेवणाची व्यवस्था चंदा रामदास वळसे पाटील यांनी केली. दिवसातुन तीन-तीन वेळा हॅास्पिटलमध्ये येऊन माझी काळजी घेतली, त्यावेळी माझ्याबरोबर कुटुंबातील काळजी घेण्यास कोणी नव्हते. त्यावेळी एकप्रकारे ती माझ्यासाठी माऊलीसारखीच धावुन आली.

Web Title: The woman who had been bed-ridden stood on her feet