पैशांच्या आमिषाने महिलेची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पुणे - विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने एका वृद्ध महिलेची सात लाख 69 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी मीना पळणीटकर (वय 60, रा. कर्वे रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पळणीटकर यांच्या भावाचा मृत्यू झाला आहे. त्याची एका खासगी विमा पॉलिसी कंपनीमध्ये पॉलिसी होती. यासंदर्भात विराट बक्षी नावाच्या व्यक्तीने पळणीटकर यांना संबंधित पॉलिसीचे लाखो रुपये मिळतील, असे फोनवर सांगितले. त्यानंतर प्रत्यक्षात घरी येऊन त्यांची वैयक्तिक माहिती घेतली. त्यानंतर त्याने पैसे मिळण्यासाठी खासगी विमा पॉलिसी कंपनीमध्ये नवीन पॉलिसी काढावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी डिसेंबर 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात बक्षी व त्याच्या साथीदारांनी पळणीटकर यांना 16 वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिसी काढण्यास सांगितले. या मोबदल्यामध्ये त्यांना 38 लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविले. त्यासाठीही आणखी वेगळी पॉलिसी काढण्याचे सुचविले. पावणेदोन वर्षात त्यांच्याकडून सात लाख 69 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात त्यांना मोबदला दिला नाही. 

Web Title: Woman's Cheating in pune

टॅग्स