Woman's Day 2021 : अवघ्या आठ वर्षांच्या तोशिकाकडून सात किल्ले सर

Womans Day 2021 eight-year-old Toshika Completed Seven forts Trek
Womans Day 2021 eight-year-old Toshika Completed Seven forts Trek

पुणे :  अवघ्या आठ वर्षांच्या तोशिका पाटीलने केवळ साडेपंधरा तासांत तब्बल सात किल्ले सर करण्याचा आगळा वेगळा पराक्रम केला आहे. यासाठी तिला बकेटलिस्ट अॅडव्हेंचरचे संचालक ऋतुराज अगवणे आणि सागरी जलतरणपटू रोहन मोरे यांनी मार्गदर्शन केले. गड किल्ले सर करण्याचा छंद असलेल्या तोशिकाला लवकरच एव्हरेस्टवर चढाई करण्याची इच्छा आहे.
 

मुळची नाशिक जिल्ह्यातील कळवाडी (मालेगाव) येथील तोशिकाने एक मार्चला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तिकोना किल्ल्यापासून या मोहिमेला सुरवात केली, ती संपली श्रीवर्धन हा किल्ला सर करून. या मोहिमेपूर्वी जानेवारी महिन्यात तोशिका आणि तिची तीन वर्षाची लहान बहीण फाल्गुनी या दोघींनी राज्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर ‘कळसूबाई’ सर केले आहे.

तोशिका म्हणाली, ‘‘नातेवाइकांसोबत गड-किल्ल्यांवर फिरायला जायचो, त्यामुळे ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. आता मला एव्हरेस्ट शिखर सर करायचे आहे. त्या शिखरावरील बर्फ मला खूप आवडतो.’’ तिने बजावलेल्या या पराक्रमाची दखल घेत नुकतेच पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.

मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द

‘‘आम्ही सहकुटुंब ट्रेकला जायचो तेव्हा इतर मुलांप्रमाणे तोशिकाचा उत्साह ओसंडून वाहायचा. सोबतच किल्ले चढताना तिच्या वेगातील सातत्य नजरेत भरणारे होते. त्यातून या मोहिमेची कल्पना सुचली.
- रोहन मोरे, सागरी जलतरणपटू

मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द

तोशिकाने सर केलेले किल्ले

किल्ला ः उंची

तिकोना ः ३ हजार ५०० फूट
तुंग ः ३ हजार ५२७ फूट
कोरीगड ः ३ हजार २८ फूट
लोहगड ः ३ हजार ३८९ फूट
विसापूर ः ३ हजार ५५६ फूट
मनोरंजन ः २ हजार ७०० फूट
श्रीवर्धन ः ३ हजार फूट

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com